TRENDING:

'आई-वडिलांसोबत खरातकडे गेली, त्याने 6 महिने..." कॅप्टनचा आणखी एक कांड, तरुणीने सगळंच सांगितलं

Last Updated:

Ashok Kharat Case Nashik: नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: 'अध्यात्म' आणि 'धार्मिक सल्ल्या'च्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका तरुणीने आधी खरातच्या 'ऑफिस बॉय'वर तक्रार केली होती, मात्र आता स्वतः खरातनेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे.
nashik crime news
nashik crime news
advertisement

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार तरुणीची अशोक खरातसोबतची ओळख तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. शेतात घर बांधण्यापूर्वी धार्मिक सल्ला घेण्यासाठी ही तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत खरातकडे गेली होती. याच ओळखीचा फायदा घेत खरातने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. पीडितेच्या आरोपानुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत अशोक खरातने तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं.

advertisement

तीच जुनी 'मोडस ऑपेरंडी'

या गुन्ह्यात अशोक खरातची गुन्हे करण्याची पद्धत पुन्हा एकदा तीच असल्याचं समोर आलं आहे. इतर पीडितांप्रमाणेच या तरुणीला देखील गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक विधी किंवा सल्ल्याच्या बहाण्याने बोलावून, अमली पदार्थाचा वापर करून महिलांचा फायदा घेतल्याचं याही प्रकरणात घडल्याचं दिसतं.

advertisement

ऑफिस बॉयचं कनेक्शन

विशेष म्हणजे पीडित तरुणीनं यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. नीरजने तिचे अश्लील फोटो बनवून तिला पाठवले आणि त्रास दिला, असा आरोप तिने केला होता. मात्र, आता तपासात आणि पीडितेच्या नवीन जबानीनुसार, या संपूर्ण प्रकरणामागे अशोक खरातचाच हात असल्याचे समोर आलं असून, खुद्द खरातनेच तिचे शोषण केल्याने तिने आता सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आहे.

advertisement

पोलीस तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

एकापाठोपाठ एक सात गुन्हे दाखल झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीत कार्यालये थाटून धार्मिक सल्ल्याच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या कृत्यांचा पोलिसांनी आता कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'आई-वडिलांसोबत खरातकडे गेली, त्याने 6 महिने..." कॅप्टनचा आणखी एक कांड, तरुणीने सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल