तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकमधील ठक्कर बझार बस स्टॅण्डवर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रविवारी (10 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपासून ते सोमवारी (11 ऑगस्ट) रात्री 8 वाजेपर्यंत मेळा बस स्टॅण्ड ते मनसे कार्यालय हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या काळात प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
advertisement
Mahadev Temple: हजार वर्षे जुनं शिवलिंग अन् वडोदऱ्याशी कनेक्शन, काय आहे नागेश्वर मंदिराचा इतिहास?
पर्यायी मार्ग
तालुका पोलीस स्टेशन ते ठक्कर बझारकडे जाणारी वाहने सीबीएस सिग्नल-मोडक सिग्नलहून इतरत्र जातील. ठक्कर बझार- सीबीएसकडे येणारी वाहतूक मोडक सिग्नलमार्गे येईल.
दरवर्षी श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये देशभरातून भाविक येतात. त्यामुळे अनेकदा वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे भाविकांसोबतच स्थानिक नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने यावर्षी अगोदरच उपाययोजना सुरू केल्या आहेत.
