पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक त्याच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बारा बंगला परिसरातील तलावाकडे गेले होते. फिरायला गेल्याबद्दल कार्तिकने त्याच्या घरातल्या कोणालाही सदस्यांना न सांगता गेला होता. तलावामध्ये पोहायला येत असल्यामुळे कार्तिक त्याच्या मित्रांसोबत गेलेला होता. तलावामध्ये उडी मारताच पोहोण्याच्या आनंदात कार्तिक फार पुढे पुढे जात राहिला. पण कार्तिकला पाण्याचा कोणताही अंदाज न आल्यामुळे तो थेट बुडाला. आनंदाच्या भरामध्ये आपण नेमकं कुठे चाललोय आणि कुठे नाही, याचा काहीही नेम त्याला लागला नाही. कार्तिक बुडत असताना त्याला कोणीही वाचवले नाही.
advertisement
कार्तिक शुक्रवारी (13 मार्च) बारा बंगला परिसरातील तलावामध्ये बुडाला होता. घटनेची माहिती स्थानिक रहिवासी, बचाव पथक, पोलीस कर्मचारी, नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी लगेचच कार्तिकचा शोध घेण्यास सुरूवात केली. स्थानिक युवकांना तलावाच्या किनाऱ्यावर त्याचे कपडे आणि हातातलं कडं अशा गोष्टी सापडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी कार्तिकचा पाण्यामध्ये शोध घेण्यासाठी सुरूवात केली. अखेर 14 मार्चला पाणबुड्यांच्या मदतीने कार्तिकचा शोध घेतला असता, तो मृतावस्थेत आढळून आला. 14 मार्चला रात्री 10 वाजता पाणबुड्यांच्या मदतीने कार्तिकचा मृतदेह काढण्यात आला.
दरम्यान, कार्तिकचा मृतदेह तलावातून काढल्यानंतर पुढच्या तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलम लिलके यांनी कार्तिकची तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, गोपनिय पोलीस निलेश देवराज, पोलीस कर्मचारी विजय रूद्रे आदी पोलीस पथक करीत आहे.
