रुही कलेक्शनमध्ये लखनऊ कॉटनसह मसलीन सिल्क, मलमल कॉटन, सेरेमिक कॉटन आणि डाबू कॉटन यांसारख्या विविध प्रकारचे फॅब्रिक्स उपलब्ध आहेत. या सर्व फॅब्रिक्समध्ये तयार केलेले कुर्ते, 2 पिस सेट आणि इतर एथनिक वेअर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत पडत आहेत. येथे कुर्त्यांचे कलेक्शन 650 रुपयांपासून सुरू होऊन सुमारे 5000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे वेगवेगळ्या बजेटमधील ग्राहकांसाठी येथे अनेक पर्याय मिळतात.
advertisement
या ठिकाणी असंख्य डिझाइन्स, विविध प्रिंट्स आणि आकर्षक रंगांमध्ये कुर्ते उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना निवडीचे भरपूर पर्याय मिळतात. विशेष म्हणजे येथील अनेक डिझाइन्स एक्सक्लुझिव्ह असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फॅशनप्रेमी महिलांमध्ये या कलेक्शनची विशेष चर्चा आहे. दुकानाकडून दिलेल्या माहितीनुसार येथील कुर्ते आणि 2 पिस सेट काही सेलिब्रिटी देखील खरेदी करतात.
कुर्त्यांसोबतच येथे प्योर कॉटन पॅन्ट आणि पलाझोचेही कलेक्शन उपलब्ध आहे. पॅन्टची किंमत सुमारे 750 रुपयांपासून सुरू होते तर पलाझो 950 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी पूर्ण एथनिक सेट तयार करण्याचा पर्याय मिळतो.
रुही कलेक्शनची आणखी एक विशेष बाब म्हणजे नव्याने कपड्यांचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी येथे होलसेल दरात माल उपलब्ध करून दिला जातो. तसेच व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना सप्लायर्सची माहिती देऊन मार्गदर्शनही केले जाते. त्यामुळे छोट्या उद्योजकांसाठी हा एक चांगला व्यवसायिक पर्याय ठरू शकतो.
रुही कलेक्शन हे दादर वेस्ट, खांडके बिल्डिंग 6 येथे असून अधिक माहितीसाठी 7559190155 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फॅशनसोबतच व्यवसायाच्या संधी निर्माण करणारे हे कलेक्शन सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.





