advertisement

Women Health : पेरिमेनोपॉजमध्ये शरीरात दिसतात 'ही' विचित्र लक्षणं! न्यूट्रिशनिस्टने दिली धक्कादायक माहिती

Last Updated:

Weird Symptoms Of Perimenopause : मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणं. मेनोपॉजच्या सुरुवातीचा काळ असतो पेरीमेनोपॉजचा. या पेरीमेनोपॉजपूर्वी शरीरात अनेक लक्षणं दिसतात. मात्र काही लक्षणं खूप विचित्र असतात.

पेरीमेनोपॉजची लक्षणं..
पेरीमेनोपॉजची लक्षणं..
मुंबई : महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे बदल होत असतात. मात्र योग्य पद्धतीने स्वतःला न संभाळल्यास सर्वात जास्त त्रासदायक टप्पा ठरू शकतो तो म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज महिलांच्या आयुष्यात शेवटी येणारा टप्पा आहे. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद होणं. मेनोपॉजच्या सुरुवातीचा काळ असतो पेरीमेनोपॉजचा. या पेरीमेनोपॉजपूर्वी शरीरात अनेक लक्षणं दिसतात.
काही लक्षणं सर्वसामान्यपणे स्त्रियांना माहित असतात. जसे की, हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग, चिडचिड, लठ्ठपणा, हाडांचा कमकुवतपणा, संधिवात, झोपेचा अभाव आणि नैराश्य. ही सामान्य लक्षणं आहेत, जी सर्व स्त्रियांमध्ये दिसतात. मात्र काही लक्षणं अशी असतात, जी खूप विचित्र असतात आणि आपल्याला त्यावरून अंदाज येत नाही की आपल्याला नेमकं काय झालं आहे.
advertisement
पेरीमेनोपॉजची काही लक्षणं अनेकदा इतकी सामान्य आणि विचित्र असतात की बहुतेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी पेरीमेनोपॉजची ही लक्षणं सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
पेरीमेनोपॉजची लक्षणं..
चव बदललेली वाटणे : अनेकदा महिलांना चव कळत नाही किंवा इतरांपेक्षा कशाचीही चव खूप वेगळी लागते. असे वारंवार झाल्यास हे पेरीमेनोपॉजचे लक्षण असू शकते.
advertisement
अधिक तीव्र वास जाणवणे : महिलांना काहीवेळा त्यांच्या आजूबाजूला एक विचित्र वास जाणवतो, जो त्यांच्या आजूबाजूच्या इतर लोकांना येत नाही. हेदेखील पेरीमेनोपॉजचे लक्षण असू शकते.
कानाला खाज आणि आवाज : कानाला विनाकारण सारखी खाज येणे. तसेच कानामध्ये सारखा आवाज येणे, म्हणजेच टिनिटसचा अनुभव. जेव्हा त्यांना अचानक कानात शिट्टी वाजण्याचा आवाज येतो. याला पेरीमेनोपॉजचे लक्षण म्हणू शकतो.
advertisement
शरीरावर जखमा : आपल्याला काही लागलेलं नसताना शरीरावर काळे, निळे किंवा काळे डाग दिसतात. विनाकारण असे डाग दिसणं, हेदेखील पेरीमेनोपॉजचे लक्षण मानले जाते.
advertisement
स्वतःवर शंका : हे लक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. महिलांना जेव्हा स्वतःवरचा विश्वास गमावतात आणि स्वतःला कायम कमी लेखतात, शंका घेतात. हे देखील पेरीमेनोपॉजचे लक्षण असू शकते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : पेरिमेनोपॉजमध्ये शरीरात दिसतात 'ही' विचित्र लक्षणं! न्यूट्रिशनिस्टने दिली धक्कादायक माहिती
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement