Summer Drink : उन्हाळा जाईल गारेगार, या पेयांनी शरीर राहिल थंड, उष्माघातापासून होईल रक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ऋतूनुसार खाण्या पिण्यात बदल करणं भारतीय परंपरेत खोलवर रुजलं आहे. आपल्या स्वयंपाकघरांतले अनेक घटक शरीराला आतून थंड ठेवतात आणि उष्माघातापासून संरक्षण देखील करतात. कोकम सरबत, पन्हं यासारखी पेयं शरीर हायड्रेट राहण्यास मदत करतात आणि उष्माघात टाळण्यास देखील मदत होते. यात व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. जाणून घेऊया आणखी पेयांचे पर्याय.
मुंबई : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांपासून आरोग्याचं रक्षण करणं गरजेचं आहे कारण या कडक उन्हात थोडीशीही निष्काळजी आरोग्याला बाधा आणू शकते.
भारतीय परंपरेत ऋतूनुसार खाण्या पिण्यात बदल केले जातात, त्यात आपल्या स्वयंपाकघरांतले अनेक घटक शरीराला आतून थंड ठेवतात आणि उष्माघातापासून संरक्षण देखील करतात. कोकम सरबत, पन्हं यासारखी पेयं शरीर हायड्रेट राहण्यास मदत करतात आणि उष्माघात टाळण्यास देखील मदत होते. यात व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. जाणून घेऊया आणखी पेयांचे पर्याय.
advertisement
कोकम सरबत - कोकम सरबत बनवण्यासाठी कोकमाच्या आगळात गरजेनुसार मीठ, साखर, भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसळा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळा आणि प्या.
पन्हं कैरीपासून बनवलं जातं. कैरी उकडवून किंवा भाजून त्याचा गर काढला जातो. त्यात थोडी जिरं पूड, काळं मीठ आणि गूळ किंवा साखर मिसळली जाते.
advertisement
सत्तू म्हणजे सातूचं पीठ. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पेय म्हणून सातूचं सरबत प्यायलं जातं. भाजलेल्या चण्यापासून बनवलेल्या या पीठानं शरीराला चांगली ऊर्जा मिळते.हे सरबत बनवणं खूप सोपं आहे. थंड पाण्यात दोन ते तीन चमचे सातू पीठ विरघळवा, त्यात काळं मीठ, भाजलेलं जिऱ्याची पूड आणि लिंबू पिळून घ्या. या सरबतानं तहान भागेल आणि पोट भरल्यासारखं वाटेल.
advertisement
ताक - दह्यापासून बनवलेले हे पेय उन्हाळ्यातलं खास आवडतं पेय. उन्हाळ्यात आपली पचनसंस्था अनेकदा मंदावते. ताकातील प्रोबायोटिक्स पचनक्रियेला मदत करतात. थंड ताक प्यायल्यानं पोट तात्काळ थंड होतं आणि हलकं वाटतं.
बेल फळाचं सरबत - बेल फळ बाहेरून जितकं कडक तितकंच आतून जास्त फायदेशीर असतं. आयुर्वेदात, बेल फळ पोटाच्या आजारांसाठी फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होतो; अशावेळी बेल फळ सरबतानं या समस्या कमी व्हायला मदत होते. यासाठी बेलफळाचा गर पाण्यात आणि गुळामधे मिसळला जातो.
advertisement
टरबूज - टरबुजामधे अंदाजे नव्वद टक्के पाणी असतं. ते फक्त एक फळ नाही तर डिहायड्रेशन भरून काढण्यासाठी एक चांगला उपाय आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 6:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Drink : उन्हाळा जाईल गारेगार, या पेयांनी शरीर राहिल थंड, उष्माघातापासून होईल रक्षण








