advertisement

Protein Paratha : न्याहारी होऊ दे जोरदार, प्रथिनयुक्त पराठ्यानं मिळेल ताकद, दिवस जाईल उत्साहात

Last Updated:

भारतात पराठे हमखास बनवले जातात. पराठ्यांचे असंख्य प्रकार आहेत. पण यात तुम्हाला पराठा प्रथिनुक्त हवा असेल तर इथे दिलेली माहिती नक्की उपयोगी येईल. हा पराठा चविष्ट आणि आरोग्यदायी आहे.

News18
News18
मुंबई : तुमच्या घरी न्याहारीला कोणकोणते पदार्थ बनवतात ? पोहे, उपमा याव्यतिरिक्त पराठे हा देखील न्याहारीसाठीचा चांगला पर्याय आहे. पराठे म्हटलं की बटाट्याचे तर असतातच पण त्यात अनेक प्रकार करुन पाहता येतात.
भारतात पराठे हमखास बनवले जातात. पराठ्यांचे असंख्य प्रकार आहेत. पण यात तुम्हाला पराठा प्रथिनुक्त हवा असेल तर इथे दिलेली माहिती नक्की उपयोगी येईल. हा पराठा चविष्ट आणि आरोग्यदायी आहे.
हा पराठा बनवण्यासाठी, उकडलेले मटार एक वाटी, 150 ग्रॅम पनीर, 1 चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, 3-4 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 1 कप पाणी एकत्र बारीक करून घ्या. हे मिश्रण असेल पराठ्याचं सारण.
advertisement
आता पीठात काय काय वापरायचं समजून घेऊया. दोन कप मिश्र धान्य पीठ, एक कप तीन-चार तास भिजवलेली मूग डाळ, एक चमचा ओवा, एक टेबलस्पून कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, एक चिरलेला कांदा आणि मूठभर कोथिंबीर एकत्र करून मऊ पीठ मळून घ्या, हे पीठ पाच-दहा मिनिटं झाकून ठेवा.
पराठा बनवण्यासाठी पिठाचा गोळा घ्या, पातळ लाटून घ्या त्यात वर सांगितलेलं सारण घाला. तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. नंतर तूप/लोणी/तेल लावा. हे पराठे चटणी, लोणचं, दही सोबत छान लागतात.
advertisement
मिश्र धान्य पीठात गहू, हरभरा, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन असतं. त्यात फायबर, प्रथिनं आणि आवश्यक खनिजं भरपूर असतात. यामुळे पचन सुधारतं आणि वजन नियंत्रित होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मधुमेहींसाठी देखील फायदेशीर मानलं जातं.
डाळीला प्रथिनांचा चांगला स्रोत मानलं जातं. मुगाच्या डाळीत प्रथिनं, फायबर, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक एसिड असतं.
advertisement
हिरव्या वाटाण्यात प्रथिनं, फायबर, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम आणि लोहाचं प्रमाण चांगलं असतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Protein Paratha : न्याहारी होऊ दे जोरदार, प्रथिनयुक्त पराठ्यानं मिळेल ताकद, दिवस जाईल उत्साहात
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement