advertisement

IPL 2026 चा पहिला सामना 'चिन्नास्वामी'वर होणार का नाही? बंगळुरूमधून आली मोठी अपडेट!

Last Updated:

आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

IPL 2026 चा पहिला सामना 'चिन्नास्वामी'वर होणार का नाही? बंगळुरूमधून आली मोठी अपडेट!
IPL 2026 चा पहिला सामना 'चिन्नास्वामी'वर होणार का नाही? बंगळुरूमधून आली मोठी अपडेट!
बंगळुरू : आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे. मोसमाचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण पहिल्या सामन्याबद्दलच सस्पेन्स निर्माण झाला होता. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्याचं आयोजन करायला कर्नाटक सरकारच्या प्रशासनाकडून परवानगी मिळत नव्हती. 4 जून 2025 रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाल्यामुळे या स्टेडियमवर सामने आयोजित करायला परवानगी दिली जात नव्हती.
कर्नाटक सरकारने उचलेल्या या कठोर पावलामुळे आयपीएलचा पहिला सामना संकटात सापडला होता, पण आता चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि आरसीबीला आयपीएल 2026 चे सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायला परवानगी दिली आहे.
'तज्ज्ञ समितीसोबत आमची बैठक झाली. स्टेडियममध्ये केलेली तयारी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा रिपोर्ट सादर केला गेला. हा रिपोर्ट तज्ज्ञ समितीच्या शिफारसींवर आधारित होता. याचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल सामने आयोजित करायला औपचारिक मान्यता मिळाली आहे', अशी प्रतिक्रिया कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रवक्ते विनय मृत्यूंजय यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा विजय झाल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, ज्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणत्याच सामन्याला परवानगी दिली नव्हती.

सुरक्षा आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली, तसंच नवीन एन्ट्री गेटही लावली गेली आणि जुन्या गेट्सची रुंदीही वाढवली गेली. प्रेक्षकांची ये जा सोपी करण्यासाठी नवीन वॉक वे देखील बनवण्यात आले.
advertisement
स्टेडियमच्या जवळपास होल्डिंग एरियाही तयार करण्यात आला आहे. इमरजन्सी सेवांसाठी वेगळी एन्ट्री आणि एक्झिट रूटही बनवण्यात आला आहे. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत मिळून तिकिटिंग सिस्टिममध्येही बदल करण्याची योजना आहे, यातून क्युआर कोड स्कॅनिंग सिस्टिमही लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे ऑनलाईन तिकीटसाठी स्टेडियमबाहेर लागणारी गर्दी कमी केली जाईल.

आरसीबी खेळणार 5 मॅच

advertisement
आयपीएल 2026 मध्ये आरसीबी चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचे 5 सामने खेळणार आहे, तर उरलेल्या 2 सामन्यांसाठी रायपूरचं स्टेडियम आरसीबीचं होम ग्राऊंड असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 चा पहिला सामना 'चिन्नास्वामी'वर होणार का नाही? बंगळुरूमधून आली मोठी अपडेट!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement