पाच संशयितांना अटक
नाशिकमध्ये दाखल झालेले कर्नाटक पोलिसांचे पथक सध्या ताब्यात असलेल्या संशयितांची कसून चौकशी करत आहे. ही लूट नेमकी कशी झाली आणि त्यामागे कोणती टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, नाशिक आणि बेळगाव या दोन राज्यांतील पोलिसांच्या समन्वयातून सुरू असलेल्या या तपासामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
लूट झालीच नाही - बेळगाव पोलिसांचा दावा
दुसरीकडे, बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी या लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात 400 कोटींच्या कंटेनर लुटीची अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले असून, त्याला अधिकृत उत्तर दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले. पोलिसांच्या या परस्परविरोधी दाव्यांमुळे या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद झालं आहे.
प्रकरणातील साहेब कोण?
दरम्यान, या कथित लुटीच्या प्रकरणात आता राजकीय कनेक्शनची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. या 400 कोटींच्या नोटांच्या लुटीमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या 'साहेबांचा' हात असल्याची कुजबूज रंगत आहे. मुंबई पोलीस मुख्यालयातही या प्रकरणावर सध्या वरिष्ठ स्तरावर सखोल विचारमंचन सुरू असल्याचं समजतं. एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव या प्रकरणाशी जोडलं जात असल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
