नेमके कारण काय?
जलकुंभाच्या आतील भागाची दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. हे काम सुरू असताना जलकुंभाचा वापर करता येणार नाही. परिणामी, पाणीपुरवठा थेट मुख्य जलवाहिनीवरून करावा लागणार आहे. पाइपलाइनमधून थेट पाणी सोडल्यामुळे त्याचा दाब कमी राहणार आहे.
Weather Alret : महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट येणार, अंगाची लाहीलाही होणार, IMD चा अलर्ट
advertisement
या भागांत पाणीपुरवठा विस्कळीत
पुढील परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार आहे:
प्रभाग 24: तिडके नगर, प्रियांका नगर पार्क, कालिका पार्क, सिद्धेश्वर मंदिर, जगतापनगर व परिसर.
प्रभाग 25: पवननगर, उंटवाडी, रायगड चौक, शनि मंदिर, उदय कॉलनी, श्रीरामनगर, भाजी मार्केट परिसर, आदर्श फ्लॅट सिस्टिम, भापकर फ्लॅट.
प्रभाग 28: उमा पार्क, शुभम पार्क, रामेश्वर नगर, इप्को कॉलनी, बंदावणे नगर, कमल नगर.
प्रभाग 29: लोकमान्य नगर, राजरत्ननगर, महाकाली चौक, आनंद नगर, तोरणा नगर.
महापालिकेचे आवाहन
पाणीपुरवठा बंद राहणार नसला तरी दाब कमी असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.






