दिलेल्या मुदतीमध्ये, भूसंपदनाबाबतीत हरकती नसल्यास शेतजमीन मालकासोबत जिल्हा प्रशासनाकडून थेट जमिनीचा व्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. बाह्य रिंग रोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या गावांपासून या रोडच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. दिंडोरी तालुक्यापासून काही वेळेच्या अंतरावरच सिंहस्थ कुंभमेळा भरवला जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या रिंग रोडला खूपच महत्त्व येणार आहे. 2027 पासून सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. त्या दृष्टीने सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत.
advertisement
बाह्य रिंग रोडचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहराच्या आजूबाजूला असणार्या 25 गावांतून रस्ता केला जाणार आहे. शहरालगत असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची जिल्हा प्रशासनाला गरज आहे. त्यासाठीच आता जिल्हा प्रशासन मालकी गटासोबत वाटाघाटी करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जमीन मालकांना 25 टक्क्यांचा अधिकचा मोबदला देऊन खरेदीची तयारी केली जात आहे. यामध्ये दिंडोरी तालुक्यातील ढकांबे, मानोरी आणि वरवंडी गावातील अनेक गावकऱ्यांची जमीन यामध्ये जात आहे. बाह्य रिंग रोड प्रकल्पासाठी अनेक गावकऱ्यांचा भू संपादनासाठी विरोध आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन तब्बल 36 हेक्टर जमीन संपादित करणार आहे.
दरम्यान, अनेक गावकऱ्यांचा जरीही विरोध सुरू असला तरीही अनेक जमिनींची मालकी गटनिश्चिती होऊन मोजणी प्रक्रिया सुद्धा आता आटोपली आहे. 15 दिवसांच्या मुदतीमध्ये प्रशासनाकडे जमिनीच्या मालकी हक्कांबाबतचे पुरावे सादर करण्याचे आवाहन उपविभागिय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना केलेले आहे.
