गोदावरी नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेल्या प्रवीण शांताराम चव्हाण याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तसेच, बोरगडमधील दगडी तलावात चंदर नथू माळेकर याचाही अशाच प्रकारे दुर्दैवी अंत झाला. ग्रामीण भागातही अशाच दुर्दैवी घटना घडल्या. सिन्नर तालुक्यातील सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे यांचा बुडून मृत्यू झाला. कळवण तालुक्यात दिनेश बाबूराव राजभोज हे नदीत वाहून गेले. तर गोवर्धनमध्ये गणेश विसर्जन करत असताना विष्णू डगळे नावाच्या तरुणाला देखील मृत्यूनं गाठलं.
advertisement
एकूणच गणेश विसर्जनाच्या दिवशी दिल्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. आपत्ती विभागाची पथकं तरुणाचा शोध घेत आहेत.
या दुर्घटनांमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडल्याचे सांगण्यात आहे.गणेशोत्सवाचा आनंद साजरा करत असताना ही दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.