अमोल मेश्राम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटेच्या वेळी ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञाताने कोयत्याने वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. भल्या सकाळी अशाप्रकारे हत्येची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खून, हाणामाऱ्या आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
advertisement
नऊ महिन्यात ४४ हत्या
विशेष म्हणजे, गेल्या नऊ महिन्यांत नाशिक शहरात तब्बल ४४ खून झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नाशिककर करत आहेत.