नीलम गोऱ्हे ठाकरेंना काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी अनेक कविता वाचून दाखवल्या. ती कविता ही त्यांच्या बाबतीतच होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्हाला बरे वाटलं. पण शेवटच्या १ वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष वर्ष कुणाला भेटत नव्हते. तिथ गेले की लक्षात यायचे की त्यांना आम्ही नको आहोत. काही झाले की सोडून गेले... सोडून गेले... पण का सोडून गेले त्याचा विचार करा ना... असा पलटवार नीलम गोऱ्हे यांनी केला.
advertisement
आम्हाला तर भेटत नव्हतेच पण उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना देखील भेटत नव्हते. मिलिंद तर आमच्या सारख्या कोरोना टेस्ट करायचा. कोविडमध्ये काम केले असे ते म्हणतात. अहो पण शिंदेसाहेब देखील काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केले ना.... ते म्हणाले रेडा कापला.. अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असा बोचरापलटवारही गोऱ्हे यांनी केला.
प्रत्येकवेळा कही पे निगाहें- कहीं पे निशाणा... सारखं सारखं कशाला? मला माहिती आहे माझ्या या बोलण्याने मी लोकांच्या निशाण्यावर येईल. माझे खूप ट्रोलिंग होईल, मात्र बोलणं गरजेचं आहे, असे गोऱ्हे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या कवितांवर पलटवार करताना नीलम गोऱ्हे यांनी कोणत्या गाण्याचा आधार घेतला?
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा...
