नागपूर: मामी आणि भाचाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. विवाहित महिलेनं आपल्या ३० वर्षीय भाच्यावर अश्लील वर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या विकृत भाच्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. मोहम्मद अल्तमश सलीम शेख असं नराधम भाच्याचं नाव आहे.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण?
32 वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासह यशोधरानगर परिसरात राहते. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असताना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. महिलेने तात्काळ विरोध करत त्याच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला.
बेडरूममध्ये अश्लील वर्तन
घटनेनंतर काही दिवसांनी, 24 फेब्रुवारीच्या सकाळी महिला घरी एकटी असताना आरोपी पुन्हा घरात आला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकललं आणि स्वतःची सुटका करून घेत बाहेर पडली.
विकृत भाच्याला अटक
त्यानंतर पीडित महिलेनं हा सगळा प्रकार आपल्या पतीच्या कानी टाकला. त्यानंतर पीडितेनं यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
"दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केलाा आहे. पीडित महिला ही आपल्या दोन मुलं आणि पतीसह यशोधानगरमध्ये वास्तव्यास आहे. घरात सासू आणि बहिण सुद्धा राहते. आरोपी शेख हा सुद्धा तिथे राहतो, तो नात्याने पीडितेचा भाचा लागतो. पीडित महिला घरी एकटी होती, त्यावेळी बेडरूममध्ये घुसून या आरोपी शेख याने आपली पँट खाली केली आणि पाठीमागून जबरदस्तीने मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला होता. हाच प्रकार १५ फ्रेब्रुवारी रोजी सुद्धा असाच प्रकार केला होता. त्यानंतर २४ फेब्रुवारीला सुद्धा असाच प्रयत्न केला होता, पण पीडितेनं त्यालाा विरोध केलाा. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली असून आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली.
