पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणालच्या आईने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या दिराशी म्हणजेच पतीच्या भावाशी म्हणजे गोमा कुंभारे यांच्याशी पळून जाऊन लग्न केले होते. या घटनेनंतर घरात कायमचा कलह सुरू झाला. आईच्या या निर्णयामुळे कुणालच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. स्वतःच्या काकाशीच आईने विवाह केल्याने समाजात अपमान झाल्याची भावना त्याच्या मनात होती. त्यामुळे तो आपल्या वडिलांसोबत राहत होता, तर आई आणि काका दुसरीकडे राहत होते.
advertisement
काका-पुतण्यामध्ये अनेकदा वाद
काकांनी आपल्या आईला पळवून नेल्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना आरोपीच्या मनात घर करुन बसली होती. त्यामुळे काका-पुतण्यामध्ये अनेकदा वाद झाले होते. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहायचं. कुणालने आपल्या काकाला अनेक वेळा 'तुला पाहून घेईन अशी धमकी दिल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
काकावर धारदार शस्त्राने केला हल्ला
अखेर बुधवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात कुणालने काकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गोमा कुंभारे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील गोमा यांना भवानीनगर रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी कुणाल आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे असून पुढील तपास सुरू केला आहे.
परिसरात एकच खळबळ
या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका नात्याने दुसऱ्या नात्याचा जीव घेतल्याची घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधातील गुंतागुंत हे या हत्येमागील प्रमुख कारण असून, पुढील तपास सुरू आहे. नातेसंबंधातील गुंतागुंत कशी जीवघेणी ठरू शकते याचे हे उदाहरण ठरले आहे.
हे ही वाचा :
मुंबईत घर घेणाऱ्यांनो सावधान! मोठा घोटाळा उघड, 103 जणांना कोट्यवधींचा गंडा
