दादर येथील कबुतरखान्याबाबत तक्रारी आल्यानंतर कोर्टाने तो बंद करण्याचा आदेश दिला होता. महानगरपालिकेने त्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, काही नारिकांनी त्याला विरोध केल्याने हे प्रकरण चिघळलं होतं. त्यानंतर लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर नवीन कबुतरखाने उघडण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
Weather Alert: नवरात्रीत पावसाचं धुमशान सुरूच, कोकणात पुन्हा अलर्ट, मुंबई-ठाण्यातून मोठं अपडेट
advertisement
बाजार आणि वर्दळीच्या भागापासून हे कबुतरखाने लांब असावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार वॉर्ड अधिकाऱ्यांनी जागांचा शोध घेतला आहे. कबुतरखान्यांसाठी जागा नसलेल्या वॉर्डमध्ये शहर भागातील ए, बी, सी, डी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण वॉर्डचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरातील एच पूर्व, के पूर्व, पी उत्तर, आर दक्षिण वॉर्डचा समावेश आहे.
दादरमध्ये कबुतरखाना नाहीच
मुंबईतील जी उत्तर वॉर्डमध्ये दादर पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील कबुतरखान्यासह आणखी 3 ठिकाणी कबुतरखाने आहेत. मात्र, दादर भागात नवीन कबुतरखाना सुरू करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
एस वॉर्डमध्ये दोन ठिकाणी नवीन कबूतरखाने तयार करण्याचा अहवाल सादर केला आहे. हे कबुतरखाने संस्थांमार्फत तयार करण्याचे नियोजन असून त्याला महापालिकेचे पाठबळ मिळणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नवीन कबुतरखाना तयार झाला आहे. मुंबईत 51 कबुतरखाने आहेत. मात्र, विधान परिषदेतील चर्चेनंतर आणि कोर्टाच्या आदेशानुसार काही कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत.
कुठे असतील नवीन कबुतरखाने?
एच पश्चिम: वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम
के पश्चिम: विलेपार्ले,अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम, जुहू, वर्सोवा
के उत्तर: जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसर, शाम नगर तलाव, महाकाली गुंफा
एल: कुर्ला, साकिनाका, चांदिवली
एम पूर्व: मानखुर्द, अणुशक्ती नगर, देवनार
एम पश्चिम: चेंबूर, टिळकनगर
एन: घाटकोपर, विद्याविहार
पी दक्षिण: गोरेगाव, आरे वसाहत
आर उत्तर: दहिसर
आर मध्य: बोरिवली
एस वॉर्ड: भांडुप, विक्रोळी, कांजुरमार्ग, नाहूर
टी वॉर्ड: मुलुंड