Weather Alert: नवरात्रीत पावसाचं धुमशान सुरूच, कोकणात पुन्हा अलर्ट, मुंबई-ठाण्यातून मोठं अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. आज पुन्हा 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात तसंच कोकण किनारपट्टीवरही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सलग अनेक दिवस पावसाचा मारा सुरूच आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम सरी बरसत आहेत. पावसाच्या या जोरदार सरींमुळे अनेक गावांत पाणी साचण्याच्या घटना घडत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. तसंच आजचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. वार्‍याचा वेग मध्यम राहणार आहे.

3/5
ठाणे व नवी मुंबई या शहरांतही पावसाचा तसाच जोर कायम आहे. काही भागांमध्ये सतत मुसळधार सरी पडत आहेत तर काही भागांत हलकासा रिमझिम पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे भागात पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात आज ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मात्र रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक राहील. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त ठरणार असला तरी शहरी भागात पाणी साचल्यामुळे विरार, वसई या शहरांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

5/5
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. रायगडमध्ये घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार सरींचा अंदाज आहे. रत्नागिरीत नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गात पावसाबरोबरच जोरदार वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement