अतिशय चांगले शिक्षण घेऊन साहेब बनण्याचे स्वप्न पाहणारा नीलेश घायवळला मित्रांच्या नादाने गुन्हेगारी क्षेत्रात गेला. त्याने स्वत:हून कोणतेही गुन्हे केले नाहीत. त्याच्याकडून काही लोकांनी गुन्हे करवून घेतले. त्याला फसवले गेले, असे नीलेशची आई म्हणाली.
कोणत्या आईला असं वाटतं की पोरांनी खून करावेत....
निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोषही सोडले. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे त्याने मला सांगितले. मागच्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा आहे. आमच्या मूळगावी सोनगाव देखील त्याला राजकारणी लोक हैराण करून सोडतात. त्याचा वापर करून घेतात, अगदी कोरोना काळातही त्याचा वापर करून घेतला पण नंतर त्याला त्रास द्यायला सुरुवात होते. मी माझ्या दोन्ही बाळांना सांगितलं- आपल्याला असले घाणेरडे उद्योग नको. कोणती आई म्हणेल की जाऊन माणसांना मार. पण मी खरंच सांगते त्याला फसवले गेलेय.
advertisement
राजकारणी लोक फसवतात, त्याचे खच्चीकरण करतात
सोनेगावला पवनचक्क्यांच्या माध्यमातून तुम्ही शेती, जमीन, बरीच संपत्ती खरेदी केल्याचे सांगितले जाते- हे सगळे खोटे आहे, बरेच लोक आमच्याविषयी खोटेनाटे पसरवतात. मी बैल पोळ्याला त्याच्यासोबत गावी गेले होते, मी ८ दिवस गावाकडे होते. असले काही झाले नाही. त्याला राजकारणी लोक फसवतात, त्याचे खच्चीकरण करतात. त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडू नये, यासाठी ते प्रयत्न करतात. त्याने माणसांत राहूच नये, त्याने कायम जेलमध्येच राहावे, असे प्रयत्न ते सातत्याने करतात. निलेश घायवळला मान वरती करून जगू देत नाही. त्याने काय केलंय? असे त्याची आई म्हणाली.