पुण्याच्या कोथरूड भागात दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करूनचौकशीचा ससेमिरा लागताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळून गेलेल्या गुंड नीलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी कुटुंबाची बाजू न्यूज १८ लोकमतसमोर मांडली. घायवळ कुटुंबाची बाजू समोर येत नसल्याने नीलेशच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले. त्यानंतर नीलेशच्या आईने गुरुवारी न्यूज १८ लोकमतशी संवाद साधून गेल्या दोन-चार महिन्यांतल्या घडामोडींवर भाष्य केले.
advertisement
राजकारणी लोक खूप वाईट, त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही
कुसुम घायवळ म्हणाल्या, निलेशने स्वत:हून काही केले नाही, त्याच्याकडून करवून घेतले गेले. न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांत निर्दोषही सोडले. त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचे, गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचे नाही, असे त्याने मला सांगितले. मागच्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगले जीवन जगत होतो. परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत. त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचे नाही. त्यांनी राजकारणात येऊ नये, गुन्हेगारीत राहावे आणि जेलमध्येच जावे, अशी राजकारण्यांची इच्छा आहे.
नगर जिल्ह्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार होता
नीलेशला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर निवडणुका आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून तो उभे राहणार होता, असा गौप्यस्फोट नीलेशच्या आईने केला. नीलेशने राजकारणात येऊ नये, त्याआधीच त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र त्याच्या विरोधकांनी रचले, असा दावा नीलेशच्या आईने केला.
नीलेशने गुन्हेगारीतच राहावी यामागे मोठे राजकारण आहे
माझी मुले सुधारण्याचा प्रयत्न करत होती. निलेशला राजकारणाचे वेड आहे. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते.मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण राजकारणी लोक त्याला फसवतात, त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात, असे नीलेशची आई म्हणाली.