राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. 28 जानेवारी हा संपूर्ण राज्यासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार आज आपल्यात नाहीत, हे खरंतर आजही महाराष्ट्रा मानायला तयार नाही. सोमवारी अजित दादांच्या निधनानंतर शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथे पार पडला. अजित दादांच्या आठवणी सांगताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. नेहमीच वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांची एक वेगळी आणि हळवी बाजूही सगळ्यांसमोर आली. या शोकसभेला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित आहेत. उद्योगपती आणि कलाकारांनीही हजेरी लावली आहे. यावेळी उपस्थितांनी अजित दादांच्या आठवणींना खास उजाळा दिला. तसेच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. . यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजित पवारांशी शेवटचा संवाद कधी झाली आणि काय बोलणं झालं, याविषयी सांगितले.
advertisement
शेवटची आठवण काय सांगितली?
नितिन गडकरी म्हणाले, अजितदादांची आणि माझी मैत्री ही राजकरणाच्या पलीकडची होती. दिल्लीला दादा आले की माझ्या घरी ते नेहमी यायचे... दादांकडे विकासाची दृष्टी, कठोर निर्णय घेण्याची हिंमत देखील होती. एकदा ते म्हणाले होते की, तुम्ही पुण्यासाठी काही तरी करा.. त्यांच्या आग्रहानंतर मी पुण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलाची ५० हजार कोटींची योजना तयार केली आणि ती मंजूर झाली. मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून भूमीपूजनाचा कार्यक्रम घेऊ हा माझा शेवटचा फोन होता.
काय म्हणाले नितिन गडकरी?
एखादी गोष्ट जनतेच्या हिताची असेल तर ती करण्याची हिंमत त्यांच्यात होती. आणि त्यासाठी किंमत चुकवायची तयारी होती. पवार परिवारावर आघात आहे. पण महाराष्ट्रावर सुद्धा आघात आहे. मी राजकारणा पलिकडचा मित्र गमवला. आपण त्यांच्या विचारांवर ठाम राहत त्यांनी सांगितलेली कामं केली तर आपण त्यांना श्रद्धांजली दिली असं होईल, असेही गडकरी म्हणाले.
अजितदादांनी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला
पुणे हे अजित पवारांचे अतिशय आवडते शहर होते. विविध विकासकामांच्या माध्यमातून अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला होता. आयटी हब असलेली हिंजवडी असो की चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार पहाटे रस्त्यावर उतरत होते. प्रश्नांची जाण, निर्णय घेण्याच्या क्षमतेबरोबर विकासकामांच्या दर्जावर त्यांचे लक्ष होते. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी ‘नासा’ला पाठवले होते.
