याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एलबीएस मार्ग ते वीर सावरकर मार्गादरम्यान 530 मीटर लांबीच्या ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा पूल 2027 च्या सुरुवातीला पूर्ण होईल, असं नियोजन महापालिकेनं केलं आहे. हा पूल उभारण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर 2022 मध्येच निविदा मागवली होती.
Mumbai Weather Today : पुढील 24 तास धोक्याचे, कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
advertisement
तयार केलेल्या आराखड्यानुसार, रेल्वे मार्गावरून जाणारा हा पूल पश्चिमेकडील भांडुप स्टेशनजवळून सुरू होईल आणि पूर्वेकडील मेनन कॉलेजजवळ उतरेल. सध्या पश्चिमेला खांब उभारण्याचं काम सुरू आहे. पुलाच्या पूर्वेकडे असलेली अतिक्रमणं आणि झाडं तोडण्यासाठी व मिठागरांच्या जमिनीच्या काही भागांच्या अधिग्रहणासाठी परवानग्या मिळवण्याचं काम सुरू आहे. भांडुपमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मार्ग किंवा अंधेरी-गोरेगाव लिंक रोड मार्गावरून वळसा घालून जावं लागतं आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळही वाढतो. ओव्हरब्रिज तयार झाल्यास ही समस्या देखील सुटणार आहे.
कसा असेल ओव्हरब्रिज?
समोर आलेल्या माहितीनुसार, ओव्हरब्रिज एकूण लांबी 529.23 मीटर असेल. त्यापैकी पूर्वेकडील बाजू 233.50 मीटर आणि पश्चिमेकडील बाजू 207.30 मीटर असेल. पुलाच्या लांबीपैकी अंदाजे 89 मीटर पूल हा रेल्वे ट्रॅकवरून जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 129.43 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.