TRENDING:

पाणीपुरी खाताना प्रेम, जंगलात नेऊन मर्डर, जळगावातील आकांक्षाला कुणी मारलं? संपूर्ण कांड समोर

Last Updated:

जळगाव जिल्ह्यातील पद्मालय वनक्षेत्रात ४ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पद्मालय वनक्षेत्रात ४ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं आता पोलीस तपासातून समोर आलं आहे. मयताच्या नाकातील मोरनी आणि पायाला लावलेली नेलपेंटवरून पोलिसांनी या घटनेचा तपास केला. हाती कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

४ फेब्रुवारी रोजी पद्मालय जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. आरोपीने ओळख पटू नये म्हणून चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकला होता. घनदाट जंगल, मोबाईल नेटवर्कची अनुपलब्धता आणि मानवी वर्दळ नसल्याने पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठे आव्हान होतं. पण पोलिसांनी तांत्रिक तपास करत पहूर येथील आरोपी स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील याला अटक केली आहे.

advertisement

पाणीपुरीच्या गाडीवर झालेली ओळख ठरली जीवघेणी

मिळालेल्या माहितीनुसार, पहूर येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१) आणि मयत आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे यांची ओळख एका पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती. आकांक्षाच्या सौंदर्यावर स्वप्नील भाळला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी स्वप्नीलला समजलं की, आकांक्षा ही तरुणी नसून एक तृतीयपंथी आहे.

advertisement

लग्नाचा तगादा अन् रागाचा भडका

आकांक्षा ही तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर स्वप्नीलच्या मनात राग निर्माण झाला. त्यातच आकांक्षाने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वप्नीलने या प्रेम कहाणीचा क्रूर अंत करण्याचं ठरवले. त्याने आकांक्षाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने पद्मालय येथे नेले. तिथे गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर तिला घनदाट जंगलात नेऊन तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.

advertisement

नेलपेंट आणि फॉरेन्सिक रिपोर्टने फिरवली चक्रे

मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटणे कठीण होते. मात्र, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सूक्ष्म निरीक्षण केले असता, मृतदेहाच्या पायाच्या नखांवर 'मॅजेंटा' रंगाची नेलपेंट आणि नाकात सोन्याची मुरनी असल्याचे आढळले. याच महत्त्वाच्या धाग्यावरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती काढली.

advertisement

अखेर आरोपी जेरबंद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई स्वप्नील पाटीलकडे वळवली. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "ती तरुणी नसून तृतीयपंथी असल्याचे समजल्याने आणि लग्नासाठी दबाव टाकत असल्याने मी तिची हत्या केली," अशी कबुली त्याने दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाणीपुरी खाताना प्रेम, जंगलात नेऊन मर्डर, जळगावातील आकांक्षाला कुणी मारलं? संपूर्ण कांड समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल