सांगोल्यात गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार बाबासाहेब देशमुख यांनी माझ्या घरावर स्वत: जाऊन हल्ला केल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण जगताप यांनी केला आहे.ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गणपतराव देशमुख यांचा आमदार नातू बाबासाहेब देशमुख हा पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण जगताप यांची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी गेला होता.या दरम्यान त्यांच्यासोबत 70 एक मुलं असल्याचा दावा नारायण जगताप यांनी केला आहे.या दरम्यान घरी आल्यावर बाबासाहेब देशमुख यांनी तुमचा मुलगा सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत असतो.यावर नारायण जगताप यांनी संबंधित प्रकरणावर मुलाला ताकीद देणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्याच्यावतीने तुमची माफी मागते असे देखील जगताप बाबासाहेब देशमुख यांना म्हणाले होते. त्यानंतर बाबासाहेब देशमुख निघून गेल्यानंतर नारायण जगताप यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप नारायण जगताप यांनी केला आहे.
advertisement
नारायण जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मांजरी येथील घरी हल्ला धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली.त्यामुळे कार्यकर्त्यांना घरावर सोडून बाबासाहेब देशमुख हे निघून गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे गणपतराव देशमुख हे संस्कार व आदर्श राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांचाच नातू असणाऱ्या आमदाराने कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करायला लावल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
बाबासाहेब देशमुख यांनी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता मला फोन केला. यावेळी फोनवरून त्यांनी चहा प्यायला घरी येत असल्याची माहिती दिली. चहा प्यायला आले पण येताता 60-70 पोर घेऊन आले. त्यानंतर पोरांना बाहेर थांबवून बाबासाहेब देशमुख घरात आले चहा प्यायल्यानंतर म्हणाले तुमचा दादा माझ्या व्हाटसअॅपवर टाकत असतो.त्यावर मी त्याला बोलावून ताकीद देतो, आणि त्याच्यावतीने मी तुमची माफी मागतो,असे नारायण जगताप यांनी सांगितले. तरी काल त्यांनी आमच्या घरावर हल्ला केला, आमच्या घरातल्या लोकांबद्दल वाईट शब्द काढले,तसेच सगळी तयारी करून ते आले होते, असा आरोप नारायण जगताप यांनी केला आहे.
दरम्यान या घटनेनंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात जगताप कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
