सध्या संपूर्ण देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. युपीएच्या सरकारच्या काळात 500 रुपयाच्या आत असलेली थाळी ही आता 1000 च्या वर पोहोचली आहे. मी कांद्याबाबत सरकारला वारंवार विनंती केली होती. कांद्याच्या निर्यातीची मागणी करत होते, कारण भारतात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन होते आणि जागतिक बाजारात कांदा नव्हता. पण सरकारने तसे केले नाही. उलट दुधाचे भरपूर उत्पादन असताना दुधाची आयात केली. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले, पण त्याचे काय झाले. त्यामुळे जर सरकार शेतकरी विरोधी असतील तर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
सरकारने वंदे भारत सुरू केले, पण त्याचबरोबर गरीब रथ रेल्वेही वाढवल्या असत्या तर आम्हीही कौतुक केले असते. कारण गरीब वंदे भारतमध्ये बसत नाहीत, तर गरीब रथ मध्ये बसतात. त्यात वंदे भारत अनेक ठिकाणी थांबेच नाहीत तर त्याचा फायदा काय. युपीएच्या काळात रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या, आता फक्त रेल्वे स्थानकावरून जातात. देशावर असलेले कर्ज 2014 मधील 55.87 लाख कोटींवरून 155.6 लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी सरकार एलआयसी, आयडीबीआय विकत आहेत आणखी काय विकतील माहिती नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर टीका केली.
