TRENDING:

Ajit Pawar: फोन, फाईल आणि फ्लाईट! अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची नवी थेअरी समोर

Last Updated:

फोन, फाईल आणि फ्लाईट या तीन बाबींवरून अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण गंभीर होत चाललंय. एका फोन कॉलमुळे अजित पवारांचा प्रवासाचा निर्णय बदलला का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. आमदार रोहित पवार यांनी विमान अपघााताबद्दल धक्कादायक माहिती दिल्यानंतर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादा मुंबईत होते. त्या संध्याकाळी काय काय घडलं होतं, याची एक एक माहिती समोर येत आहे. अजितदादांनी फाईलीवर सही करण्यासाठी थांबवणं आणि एका नेत्याचा फोन येणं या घटनाक्रमावरून राजकीय आरोपप्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
News18
News18
advertisement

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधत गंभीर शंका उपस्थित केल्यात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी, प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आला होता असं वक्तव्य केलंय. हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.

advertisement

फोन, फाईल आणि फ्लाईट या तीन बाबींवरून अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण गंभीर होत चाललंय. एका फोन कॉलमुळे अजित पवारांचा प्रवासाचा निर्णय बदलला का? आणि त्या निर्णयामुळेच हा अपघात घडला का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी बारामतीला कारने जाणार होते, अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र, संध्याकाळी आलेल्या एका फोननंतर त्यांनी निर्णय बदलला आणि सर्वच बदलून गेलं.

advertisement

'बाय-रोडनं जाण्याची तयारी झाली होती. पण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता, असा दावाच राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी केलाा आणि चर्चेला तोंड फुटलं.

प्रमोद हिंदूराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते असल्यानं त्यांच्या वक्तव्यानं अपघाताचं प्रकरण घातपाताच्या वळणावर जाताना दिसतंय. तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही, एका वरिष्ठ नेत्यानं फाईल क्लिअर करण्यासाठी आग्रह धरला होता आणि ती फाईल येईपर्यंत उशीर झाल्यानं विमानाने जाण्याचा निर्णय घेतला गेला. या मुद्याकडे लक्ष वेधलं.

advertisement

अजितदादांनी कोणत्या फाईलीवर केली सही?

अजित पवारांनी भंडारा-गोंदियातील राईस मिलशी संबंधित फाईलवर शेवटची सही केली होती. आणि तीच फाईल आणण्यासाठी साडेसात ते आठ वाजले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसऱ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टकडेही रोहित पवारांनी लक्ष वेधलं.

अपघाताचा संपूर्ण प्रकार संशयास्पद - संजय राऊत

रोहित पवारांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघातावरून अनेक मुद्दे मांडले.'पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा?' 'कोणत्या फाईलवर सही हवी होती' 'अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? असं म्हणत अपघाताचा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे. कोणत्या फाईलवर सही झाली नसती तर महाराष्ट्राचा विकास झाला नसता?' असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

advertisement

संजय राऊत आणि रोहित पवार या विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीतल्या कोणत्याही नेत्याचं थेट नाव घेतलं नाही. मात्र, अजित पवारांच्या पक्षातील प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेतलं. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सुरू असला तरी अपघातामागचं नेमकं कारण काय? फोन कॉल आणि फाईलचा कितपत संबंध आहे? जाणूनबुजून अजित पवारांना उशीर करण्यात आला का? हे प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनी अनेकांकडे संशयाची सूई फिरवली आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय राजकारण थांबणार नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: फोन, फाईल आणि फ्लाईट! अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची नवी थेअरी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल