रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत, असे म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी, तपासाची चक्रे फिरवली
मित्राच्या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली.
advertisement
लातूरहून आरोपीला बेड्या
दरम्यान, हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर येथे रवाना झाले आणि अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकण्यात यश आले. अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येच्या प्रयत्नाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपीने दहशत माजवली
फिर्यादी पिंपरी येथे गेले असता आरोपीने त्यांच्याकडे २० रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. आरोपीने खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या गळ्यावर आणि मानेला वार केला. तसेच उपस्थित नागरिकांना चाकू दाखवत आरोपीने धमकावत दहशत माजवली.
