पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी मनसेने जातीय समीकरण अगदी व्यवस्थितपणे साधले आहे. तसेच जाहीर केलेल्या १६ उमेदवारांपैकी ७ महिलांना मनसेने संधी दिलेली आहे. प्रभागांत ताकद असलेल्या उमेदवारांनाच मनसेने रिंगणात उतरवले आहे.
पिंपरी चिंचवड मनसे अधिकृत उमेदवार यादी
प्रभाग क्रमांक 2
श्री.जयसिंग भाट( ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8
श्री प्रतिक बबन जिते(ड) सर्वसाधारण
advertisement
प्रभाग क्रमांक 10
1. सौ गीता नितीन चव्हाण (ब) महिला ओबीसी
2.श्री कैलास दुर्गे (क) सर्वसाधारण
3.हर्षकुमार महाडिक (ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 13
1. सचिन तुकाराम चिखले (ड) सर्वसाधारण
2.अश्विनी सचिन चिखले (क ) महिला सर्वसाधारण
3 शशिकिरण गवळी (अ) अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 14
सौ.आदिती चावरिया (ब) महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15
सौ.स्वाती चंद्रकांत दानवले (क ) महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 16
सौ. अस्मिता प्रदीप माळी (ब) महिला ओबीसी
प्रभाग क्रमांक 19
1. लता खंडू शिंदे (अ ) अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 21
1.राजू सुदाम भालेराव (ड ) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 27
श्री.तुकाराम सदाशिव शिंदे (अ) अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 30
सौ. रेखा सुधीर जम (क) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक 32
श्री राजू सावळे (ड) सर्वसाधारण
सेना-भाजप-राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढण्याने प्रचंड मतविभाजन
अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगवेगळे लढत असल्याने प्रचंड मतविभाजन होणार आहे. त्यात उमेदवारांना जिंकण्यासाठी फार मतांची आवश्यकता लागणार नसल्याचे चित्र आहे. अगदी कमी मतांनीही एखाद्याचा विजय किंवा पराभव होऊ शकतो. त्यामुळे कमी जागांवर लढून तिथेच अधिक लक्ष घालण्याची रणनीती मनसेने आखल्याचे सांगण्यात येते.
