अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूवरून धक्कादायक दावे केले. तसेच त्याअनुषंगाने त्यांनी विमान कंपनीच्या मालकाला प्रश्न विचारून कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित केली. या पत्रकार परिषदेची देशभरात चर्चा होत असताना अजित पवार यांच्यासोबत अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी हिच्या वडिलांनी देखील अपघात नसून घातपातच असल्याचे म्हटले आहे.
advertisement
यापूर्वी काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास मग अपघातावेळी पांढऱ्या रंगाचे विमान का?
यापूर्वी पिंकी माळीने चार वेळा अजित दादांबरोबर काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले असा सवालही त्यांनी केला. वाहतूक कोंडीमुळं पायलट पोहोचू शकला नव्हता हा दावाही खोडून काढत मुंबईत सकाळी ६ वाजता कोणत्या भागात ट्राफिक असते? असा सवाल पिंकी माळीच्या वडीलांनी केला.
रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याजवळ असलेले पुरावे सगळ्यांसमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्या प्रमाणेच आम्हालाही हा घातपात असल्याचा संशय आहे, असा सनसनाटी आरोप पिंकी माळीच्या कुटुंबियांनी केलाय.
अजूनही आम्हाला कोणतीही भरपाई दिली नाही
अजूनपर्यंत पिंकी माळीच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही. तसंच पिंकी माळीनं अपघात होण्यापूर्वी वेगळ्या विमानातून प्रवास केला होता. पहिल्यांदाच तिनं अपघातग्रस्त विमानातून प्रवास केला होता अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिलीय. अजित पवारांचं विमान बदललं गेल्याचाही शिवकुमार माळी यांनी दावा केलाय.
