पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. 'भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित अटळ आहे,' अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
advertisement
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
‘आज या कार्यक्रमाची चर्चा करत असताना, मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो, माझी पंतप्रधान पदाच्या उमेदवारी निवड झाली होती, त्यावेळी मी रायगडावर येऊन शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ येऊन बसलो होतो. मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
काँग्रेसवरही निशाणा
'आमचे संस्कार वेगळे आहे. आम्ही ते लोक नाही, भारताचे सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. सावरकर यांच्यावर नको त्या शब्दांत टीका करतात, पण माफी मागत नाही. कोर्टात जातात. तरी त्यांना पश्चाताप होत नाही', असं म्हणत मोदींनी विरोधकांवरही टीका केली.