नागपूर: गणेशपेठ पोलीस आणि नागपूरच्या एनडीपीएस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्था विक्री विरोधात मोठी कारवाई केली. कुशल सिंग सरदारसिंग सोडिया, संजय बगदीराम विश्वकर्मा आणि हर्षल विलासराव बांते अशी अटकेतील आरोपींचे नाव आहे. यामध्ये 104 ग्रम MD जप्त केली. तेच दोघे अद्याप फरार आहेत.
गणेशपेठ बसस्थानकाजवळ रात्रीच्या वेळी हा छापा टाकण्यात आला. गणेशपेठ परिसरातील राहुल कॉम्प्लेक्समध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. हे तिन्ही आरोपी ट्रॅव्हल्स बसने गणेशपेठ बसस्थानकावर पोहोचले. पण अगोदरपासून पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानं ते सापळा लावून बसले होते. त्यामुळे बस स्थानकावर उतरताच तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.
advertisement
तीन मोबाईल फोन जप्त
या टोळीतील अन्य दोन आरोपी हे मध्य प्रदेशचे रहिवासी आहे. ते सुद्धा ट्रॅव्हल्स बसने नागपूरला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 104 ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल फोन जप्त करून एकूण 10.70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
व्यसन पूर्ण करण्यासाठी जुगाड
अनेक जणांना विविध प्रकारची व्यसने आहे. कुणाला दारूचे, कुणाला सिगारेटचे तर कुणाला गांजाचेही व्यवसन आहे. त्यामुळे जेव्हा या व्यसनाधीन लोकांना आपले व्यसन पूर्ण करता येत नाही, तेव्हा ही लोकं आपापाल्या पद्धतीने विविध प्रकारे व्यसन पूर्ण करतात. त्यासाठी वेगवेगळे जुगाड करताना दिसतात.
