परीक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झालेल्या या हलगर्जीपणामुळे अनेक उमेदवारांचे मानसिक संतुलन ढासळले. काहींना प्रश्नपत्रिका परत घेऊन दुसरी देण्यात आली, तर काहींना किती वेळ द्यायचा याबाबतही स्पष्टता नव्हती. परिणामी, एकाच परीक्षेत वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळा अनुभव आल्याने निकालाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित प्रकार हा केवळ तांत्रिक घोळ नसून प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि निष्काळजीपणाचा नमुना असल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून केला जात आहे. आमच्या भवितव्याशी खेळ झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे. काही परीक्षार्थ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
advertisement
परीक्षेनंतर एकामागून एक तक्रारी पुढे येत असल्याने प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने तत्काळ खुलासा करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही उमेदवारांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकारावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का आणि परीक्षार्थ्यांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
