पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागीरदार असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बंटी जहागीरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. बंटी जहागीरदार हा आपल्या एका साथीदारासह स्कुटीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बंटी जहागीरदारवर बेछुट गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
श्रीरामपूरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं की, दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बंटी जहागीरदार आणि त्याचा साथीदार हे दोघे स्कुटीवरून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार जखमी झाला होता. त्याला साखर कारखाना इथं दाखल करण्यात आलं होतं."
तसंच, "या प्रकरणी ५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच आरोपी हे पकडले जातील. लोकांनी शांतता राखावी कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, शांतता भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन सोमनाथ घार्गे यांनी केली.
बंटी जहागीरदारचा मृत्यू झाल्याची शक्यता
जखमी बंटी जाहगीरदार याला उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मात्र उपचारापूर्वी बंटी जहागीरदार याचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. पण, पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. बंटी जहागीरदारच्या मृत्यूमुळे श्रीरामपूरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस तपासात हल्लेखोराचा रेकी आणि गोळ्या झाडतांनाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. श्रीरामपूरातील प्रभाग २ परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. हल्लेखोरच्या शोधा करिता पोलीस पथके रवाना झाले आहे.
जमावावे पोलीस स्टेशनला घातला घेराव
बंटी जहागीरदार हा 2012 मधील पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. 2023 पासून तो जामिनावर होता. बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त जमावाने श्रीरामपूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. हल्लेखोरांना पकडण्याची मागणी लावून धरली. बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार झाल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपुरात तणावाची परिस्थिती आहे.
