राज्यातील पुणे, मुंबई, कोकण या पट्ट्यात सध्या तुफान पाऊस कोसळत आहे. काल रात्री पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पुरस्थिती उद्भवली आहे. लवासामध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. यात एक बंगला भुस्खलनामुळे थेट डोंगरउतारावरून खाली कोसळला आहे.
लवासामध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस:
काल रात्री पुणे जिल्ह्यातील पुणे शहर , पिंपरी-चिंचवड आणि पश्चिमेकडील सर्व तालुके या संपूर्ण पट्ट्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. अतिवृष्टी झाली. मुळा, मुठा नद्यांना पूर आला. खडकवासला, पवना धरणे भरली. तिकडे लवासामध्ये तर अक्षरश: पावसाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले. एका रात्रीत लवास परिसरात जवळपास 550 मीमी पावसाची नोंद झाली. परिणामी लवासामध्ये काही ठिकाणी भुस्खलनाचे प्रकार घडले, त्यामुळे डोंगरउताराच्या टेकडीवरील एक बंगला थेट घसरून रस्त्यावर आला. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
advertisement
पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं:
धवारी रात्रभर पडलेल्या पावसाने पुणे जलमय झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी इमारतींमध्ये पाणी शिरलंय. काही ठिकाणी लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि बचावपथक कार्यरत आहेत. दरम्यान, खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. पुण्यात गेल्या 24 तासात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात एकाच ठिकाणी तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला तर एकाचा दरड अंगावर कोसळल्यानं मृत्यू झालाय.
राज्यात पावसाचा हाहाकार! पुढील 24 तास महत्वाचे, तुमच्या जिल्ह्यात अशी राहील परिस्थिती
महाराष्ट्राला अलर्ट:
राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात येतं आहे. पुणे, मुंबई, कोकण, सातारा आणि कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
