TRENDING:

कायम हृदयात राहशील..." मृत्यूची वेळही त्यानेच ठरवली अन् अंत्यविधीचीही! इन्स्टाग्रामवर स्वतःलाच श्रद्धांजली वाहून तरुणानं मृत्यूला मारली मिठी

Last Updated:

"सॉरी फॅमिली, मी तुमचा.." स्वतःच्याच मृत्यूची पोस्ट टाकून १८ वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवलं; पुसद हादरलं! कायम हृदयात राहशील..." स्वतःसाठीच श्रद्धांजी स्टेटस, अंत्ययात्रेची वेळही सांगितली, 18 वर्षीय तरुणाननं मृत्यूला मारली मिठी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
11दुपारी दोन वाजताची वेळ, खोलीतून काहीच आवाज येईना म्हणून आजीने पाहिले तर समोर जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली, समोर नातवाचा मृतदेह होता तोही लटकत, आजीचे हातपाय लटपटायला लागले आणि तोंडातून जोरात किंकाळी आली. तिने आरडाओरडा केला. काय घडलं ते तिला समजून घेऊन पचवेपर्यंत काहीसा उशीर झाला होता. तिने आपला नातू गमावला होता. आजीने आजूबाजूच्यांना बोलवलं आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.
News18
News18
advertisement

संध्याकाळी सहाच्या सुमारास मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. 18 वर्षीय तरुणाने आधी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून मग टोकाचं पाऊल उचललं होतं. 29 डिसेंबर रोजी सकाळी 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरी लाकडाच्या बल्लीला पांढऱ्या शेल्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं.

18 वर्षीय तरुणाचे वडील पुण्यात कामाला आहेत. तो आजीसोबत राहात होता. तरुणाने टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास सुरू आहे. ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र त्याने इन्स्टावर पोस्ट लिहिली होती. त्याने आपल्या अंत्यसंस्काराची आणि जाण्याची वेळही सांगितली होती अशी माहिती मिळाली आहे. ही धक्कादायक घटना पुसद शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या हुडी बु. इथे घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणाचं नाव शिवराज रामराव दोडके असल्याचं सांगण्यात आलं आहे.

advertisement

तरुणाने इन्स्टा पोस्ट करुन एक स्टोरी ठेवली होती. त्यामध्ये.. "सॉरी फॅमिली मी तुमचा आधार नाही बनू शकलो. कायम आमच्या हृदयात राहशील, मिस यू किंग, शिवराज दोडके यांचे आज दुपारी १ वाजता निधन आहे. तर अंत्यविधी उद्या १२ वाजून ४५ मिनिटाला आहे. मुक्काम पोस्ट हुडी बु. तालुका पुसद जिल्हा यवतमाळ" लिहून भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज दोडके अशा प्रकारची बॅनर सदृश्य पोस्ट त्याने, त्याची इंस्टाग्रामवर ठेवली होती. त्यानंतरच आयुष्य संपवलं असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आलं. इंस्टाग्रामवर त्याचे १,३१७ फॉलोअर होते, तर तो स्वतः ८३ लोकांना फॉलो करत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

धक्कादायक बाब म्हणजे त्याने इन्स्टावर स्वत:चा फोटो ठेवून त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यासोबत त्याने मृत्यूची आणि अंत्ययात्रेची वेळही दिली होती. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याने असं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं अजून कारण स्पष्ट झालं नाही. प्राथमिक तपासात सहाय्यक पोलीस फौजदार किसन जाधव आणि पोलीस संतोष राठोड यांनी ही माहिती दिली पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कायम हृदयात राहशील..." मृत्यूची वेळही त्यानेच ठरवली अन् अंत्यविधीचीही! इन्स्टाग्रामवर स्वतःलाच श्रद्धांजली वाहून तरुणानं मृत्यूला मारली मिठी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल