राज्यातील राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नुकतीच झालेली भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
राज्यात चर्चांना उधाण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यात
advertisement
राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनीती आखण्यासाठी ही भेट ठरवण्यात आली असावी, अशा चर्चाही रंगल्या आहेत.
नेमकी भेट कशासाठी झाली?
अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच, नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एन.सी.डी.सी. लोनमुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंतीही यावेळी विखे पिता पुत्राने केली आहे. अमित शाह यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.