नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ओंकार बरगे नावाच्या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघंही राधानगरी येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. त्यांनी आत्महत्या केली ही त्यांच्यासोबत काही घातपात घडला? याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.
राधानगरीच्या जंगलात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एकाच झाडाला दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि पंचनामा केला.
advertisement
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या प्रेमी युगुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरच्यांचा विरोधा होता की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. ओंकार बरगे आणि ती अल्पवयीन मुलगी एकाच गावातील असल्याने शेळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. राधानगरी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
