BJP-Sena Yuti: महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला…
महायुतीच्या जागावाटपचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक सुरू होती.. दरम्यान, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील एमएमआर महापालिकांमधील शिवसेना-भाजप युती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात स्थानिक पातळीवर प्रभागस्तरावरील उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर लवकरच महायुतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे… या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे या बैठकीच्या वेळी उपस्थित होते.