केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. अजित पवार आणि शरद पवार यांचे एकत्र येणे, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची प्रस्तावित युती, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष अशा विषयांवर रामदास आठवले यांनी भूमिका मांडली.
ठाकरे फुटले की आघाडीत फूट पडणार आणि त्याचा फायदा आम्हाला होणार
advertisement
रामदास आठवले म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावे लागेल. त्यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा फायदा आम्हाला होईल पण प्रकाश आंबेडकर एकत्र येणार नाही, असे आठवले म्हणाले.
काका पुतणे एकत्र येऊन महायुतीला फायदा होणार असेल तर...
शरद पवार आणि अजित पवार यांच्याही एकत्रित येण्यावर आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली. काका पुतणे एकत्र येऊन महायुतीला फायदा होणार असेल तर त्यांचे स्वागत आहे. परंतु एक नक्की की शरद पवार महायुती सोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असे मोठे विधान आठवले यांनी केले.
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा-आठवले
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा ही आमची भूमिका आहे, असेही आठवले म्हणाले. यावेळी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविल्याबद्दल आठवले यांनी
अभिनंदनही केले.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळावेत अशी माझी मागणी -आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळावेत अशी माझी मागणी आहे. सध्या जरी मिळत नसले तरी लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असा मला विश्वास आहे, असे रामदास आठवले म्हणाले.