TRENDING:

Ratnagiri News: रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू, पालघरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Last Updated:

Ratnagiri News: कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका कुटुंबावर रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश जाधव, प्रतिनिधी, रत्नागिरी: कोकणच्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका कुटुंबावर रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्याचा मोह न आवरल्याने दोन पर्यटक पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. संतोष शशिकांत भानुशाली असं मृताच नाव आहे.
AI Image : रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू, पालघरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
AI Image : रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू, पालघरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील भानुशाली कुटुंब रविवारी सकाळीच पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. आरे-वारे येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहून कुटुंबातील तरुण उत्साहाने पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

स्थानिकांची देवदूतासारखी मदत

advertisement

दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि आरे-वारेचे पोलीस पाटील आदेश कदम यांनी जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने संतोष शशिकांत भानुशाली यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सुयोग भानुशाली यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

पर्यटनासाठी आलेल्या आनंदी कुटुंबावर या घटनेमुळे डोंगर कोसळला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच समुद्रात उधाण आणि अनपेक्षित लाटांचे प्रमाण वाढत असल्याने पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, या दुर्घटनेने आरे-वारे परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News: रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले, एकाचा मृत्यू, पालघरच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल