ही घटना खेड लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये घडली. याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी कदम प्रितेश प्रभाकर यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी काही काळापासून लोटे येथील गुरुकुलात राहून आध्यात्मिक शिक्षण घेत होती. या काळात गुरुकुल प्रमुख भगवान कोकरे महाराज हे तिच्याशी वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केल आहे. सुरुवातीला तिने हा प्रकार गुरुकुलातील एका सदस्याला सांगितला. मात्र त्याने 'महाराजांची सामाजिक आणि राजकीय ओळख आहे. याबाबत कोणाला काही बोलू नकोस', असे सांगून तिला गप्प केले. मात्र, हे वारंवार घडत राहिल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली.
advertisement
त्यानंतर कुटुंबीयांनी थेट खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी भगवान कोकरे महाराज व प्रितेश कदम यांना ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.