या प्रकरणातील मृत मुलगी प्राणगी हिच्या आजोबांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणगी आणि तिच्या मावशीला केडीएमसीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी दोघींना एक तास ठेवलं. त्यानंतर त्यांना ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली नाही. शेवटी पेशंटला खासगी चारचाकी वाहनातून ठाण्याला नेण्यात आलं.
advertisement
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दोघींचा जीव गेला असल्याचं मुलीचे आजोबा म्हणाले आहेत. ते म्हणाले, "आमच्या घरात झालेल्या दोन मृत्यूंसाठी सर्वस्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. महानगरपालिकाच भ्रष्ट आहे. आरोग्य सुविधांवर पैसे खर्च करण्याऐवजी त्यांना रस्त्यांची काम काढून त्यात भ्रष्टाचार करण्यात जास्त रस आहे. प्रशासनाने आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे."
काय आहे प्रकरण ?
प्राणगी विकी भोईर (वय 4 वर्षे) आणि बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (वय 23 वर्षे) अशी मृत्यू झालेल्य दोघींची नावं आहे. शनिवार-रविवारी शाळेला सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यासाठी आली होती. प्राणगी आणि तिची मावशी गाढ झोपेत असताना विषारी सापाने दोघींना चावा घेतला. दोघींना अगोदर केडीएमसीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. प्राणगीला रुग्णालयाच्या दारातच मृत घोषित करण्यात आलं होतं. तर तिच्या मावशीला ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगण्यात आलं होतं.