TRENDING:

Rohit Pawar:मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा! रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक

Last Updated:

Rohit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून, पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा! रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा! रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक
advertisement

पुरावे असताना कारवाई का नाही? रोहित पवारांचा संतप्त सवाल

रोहित पवार यांनी पोलिसांना धारेवर धरत विचारले की, "राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर (FIR) का दाखल करत नाहीत?" विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

advertisement

पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
सर्व पहा

आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत," असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar:मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा! रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल