डीजीसीएवर (DGCA) संशयाची सुई
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "या अपघातात डीजीसीएचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी २५ पैकी केवळ ५ विमाने बंद करून कारवाईचा दिखावा केला आहे. आमच्याकडे नवीन कायद्याचे पुस्तक आहे, ज्यातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. पोलीस कर्मचारी जाधव, माळी, अटेंडर आणि पायलट या सर्वांचा मृत्यू झाला आहे, ही घटना सर्वांना माहीत असताना पोलीस टाळाटाळ का करत आहेत?", असा सवाल त्यांनी केला.
advertisement
पोलीस ठाण्यातील तो थरार
रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यातील घटनाक्रम सांगताना सांगितले की, आमचे वकील प्रांजळ यांनी पोलिसांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर लॅपटॉप आणला गेला आणि माझे स्टेटमेंट लिहिण्यास सुरुवातही झाली होती. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच डीसीपी आले आणि त्यांनी एफआयआर घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
"अधिकार कोणी हिरावला?"
रोहित पवार यांनी अत्यंत संतप्तपणे विचारले की, "एफआयआर दाखल करणे हा आमचा घटनादत्त अधिकार आहे. पोलीस आम्हाला आमचा अधिकार का वापरू देत नाहीत? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली आहे? आम्ही आज इथे हक्कासाठी आलो होतो, अजितदादांना न्याय मिळत नाही. तिथे सामान्यांचे काय होत असेल असा सवाल त्यांनी केला.
शर्ट काढला तरी एफआयआर, मग अपघाताचा एफआयआर का नाही?
रोहित पवारांनी पुढे म्हटले की, मराठी माणूस होता. आमचा माणूस होता म्हणून FIR घेतले नाही का? असा सवाल करताना दिल्लीत काँग्रेसने शर्ट काढले तर FIR घेतला, अपघात झाला तर FIR होतो. मग आमचा उपमुख्यमंत्री गेला आहे अपघातात, त्याचा FIR का नाही? असा हताश सवाल त्यांनी केला.उद्या सकाळी १० वाजता बारामती येथे जाऊन दादा यांनी बांधलेल्या इमारतीत जाऊन FIR दाखल करणार असून तिथे तरी एफआयआर दाखल होतोय का हे पाहणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
