TRENDING:

Special Report: रोहित पवार यांच्या जीवावर कोण उठलंय? जीवाला कुणामुळं धोका?

Last Updated:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या शंकांचं काहूर ज्यांनी उठवलं आणि त्याला धार देण्याचं काम केलं ते म्हणजे आमदार रोहित पवार. रोहित पवार यांनी दोन मोठ्या पत्रकार परिषदा घेऊन अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पत्रकार परिषदांमधून सर्वसामान्यांनाही थक्क करणारी माहिती त्यांनी समोर आणलीय. अजित पवारांचा अपघात हा घातपात तर नाही ना अशी शंका व्यक्त केली. आता त्यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय त्यामुळे प्रश्न आहे की त्यांच्या जीवावर कोण उठलंय.
अजित पवार-सुप्रिया सुळे-रोहित पवार
अजित पवार-सुप्रिया सुळे-रोहित पवार
advertisement

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात आहे. खरं तर खुद्द रोहित पवारांनी या विषयी सुतोवाच केलं होतं. माझ्या परिवाराला माझी भीती वाटते आहे. मोठ्या लोकांना अंगावर घेतोयस तर आम्हाला तुझी काळजी वाटतीये, अशी भीती कुटुंबियांनी व्यक्त केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित अस्वस्थ, त्याच्या जीवाला धोका- सुप्रिया सुळे

advertisement

आता खासदार सुप्रिया सुळेंनीही त्याला दुजोरा दिला आहे. मला रोहितची काळजी वाटतीये. मुख्यमंत्र्यांनी रोहितला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे रोहित पवार टार्गेटवर आल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत विमान अपघाताविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यासाठी काही पुरावेही त्यांनी सादर केले होते. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

advertisement

डीजीसीएतील अधिकाऱ्यांपासून ते विमान कंपनीबाबत रोहित पवारांचे प्रश्न

डीजीसीएतील अधिकाऱ्यांपासून ते विमान कंपनीबाबत रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावरही त्यांनी संशय व्यक्त केलाय. भाजपशी संबंधित कुटुंब आणि VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांचे संबंधही रोहित पवारांनी अधोरेखित केले. मुख्य आरोपी रोहित सिंग सध्या अमेरिकेत असून दुबईतही त्यांचे कार्यालय आहे. देशात इतकं मोठा वादंग निर्माण झालेला असताना त्यांना परदेशात जाण्यास कोणी मदत केली, हा तपासातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, असा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला.

advertisement

विमान अपघाताच्या तपासा विषयीच्या गतीवरही रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय. तसेच पायलटच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळेचं ते टार्गेटवर आल्याचा दावा केला जात आहे.

रोहित पवार म्हणाले जीवाला धोका, सत्ताधारी म्हणाले...

सरकारकडे निवेदन द्यावे सरकार त्यांना सुरक्षा देईल, असे मिटकरी म्हणाले. तर त्यांच्यावर हल्ला होईल असं वाटत नाही. गृहमंत्रालयाकडून योग्य ती कारवाई होईल, असे भुजबळ म्हणाले.

advertisement

त्याची एक समिती असते, जीवाला धोका असल्यास समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल देते, असे शिरसाट म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

VSR कंपनीची अनियमितता, ब्लॅक बॉक्सचा संशय आणि आयटी सेलकडून होणारं ट्रोलिंग यावर रोहित पवारांनी सविस्तर भाष्य केलंय. सध्या याप्रकरणाचा तपास एएआयबी आणि डीजीसीए कडून केला जातोय. या प्रकरणाची सीबीय चौकशीची शिफारस राज्य सरकारनं आधीच केलीय. मात्र, आता रोहित पवारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Special Report: रोहित पवार यांच्या जीवावर कोण उठलंय? जीवाला कुणामुळं धोका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल