TRENDING:

RSS Congress : संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण, नितीन राऊत म्हणाले, ''मी तर...''

Last Updated:

RSS Congress : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण, नितीन राऊत म्हणाले, ''मी तर...''
संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण, नितीन राऊत म्हणाले, ''मी तर...''
advertisement

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत असून शताब्दी वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संघाच्यावतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये दसरा कार्यक्रमात सरसंघचालकांकडून होणारे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

यंदाचे संघाचे शताब्दी वर्ष असून यंदाचा सोहळा भव्य दिव्य व्हावा असा संघाचा प्रयत्न सुरू आहे. या शताब्दी वर्षाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय, दसरा कार्यक्रमही संस्मरणीय करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे. अशातच संघाच्यावतीने दसरा कार्यक्रमाचे आमंत्रण काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे.

advertisement

काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, विकास ठाकरे, नितीन राऊत यांना संघाने निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार काही काँग्रेस नेत्यांनी संघाकडून दिलेलं निमंत्रण नाकारलं आहे. संघाच्या विचारधारेशी असहमती असल्याने निमंत्रण नाकारले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. त्यामुळे आता

advertisement

दसरा सोहळ्यात काँग्रेस नेते सहभागी होणार का? याकडे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नितीन राऊत काय म्हणाले?

काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रेशीमबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला मिळाले. निमंत्रण देण्यासाठी आल्यावर मी त्यांचे मनापासून स्वागत केले. आपल्याला कोणी भेटायला आले तर त्याच स्वागत करायचं आपली संस्कृती आहे. मात्र या शताब्दी सोहळ्यात मी जाण्याचं प्रश्नच उद्भवतच नसल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.

advertisement

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय संविधानाला विरोध केला होता, ज्या संघाने तिरंगा झेंडा आपल्या मुख्यालयात अनेक वर्ष लावला नाही, ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराला विरोध केला अशा संघटनेच्या व्यासपीठावर जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

नितीन राऊत यांनी म्हटले की, मी एका चळवळीचा कार्यकर्ता असल्याने मी तिकडे कसा जाणार. मी दीक्षाभूमीचा आणि जय भीमचा कार्यकर्ता आहे. संघभूमीचा नाही. आमची लढाई संघ भूमी विरुद्ध दीक्षाभूमी अशी आहे. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमात जाण्याचा प्रश्न येत नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RSS Congress : संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण, नितीन राऊत म्हणाले, ''मी तर...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल