नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची प्रेयसी आचल मामीडवार कुटूंबियांकडून सक्षम याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता आठवरती गेली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबास 8 लाख 25 हजारांची आर्थिक मदत तसेच परिवारातील एका सदस्यास शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
4 लाख 12 हजार 500 रुपये जमा होणार
समाजकल्याण विभागामार्फत 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र ताटे परिवारातील सदस्यांच्या बँक खात्यांबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याने रक्कम जमा होऊ शकली नव्हती. आता त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून आज किंवा उद्यापर्यंत ही रक्कम खात्यात जमा होईल, अशी माहिती सहायक समाजकल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली. उर्वरित रक्कम चार्जशीट दाखल झाल्यानंतर कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
24 तास दोन कर्मचारी सक्षमच्या घरापुढे तैनात
सक्षम ताटे हत्याप्रकरणी आंचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत तर या प्रकरणातील दोघे आरोपी फरार आहेत. तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान, सक्षमच्या कुटुंबांला धोका असून सुरक्षा देण्याची मागणी आंचलने केली होती. शिवाय विविध संघटनानी देखील सक्षमच्या कुटुंबियांकरिता पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. त्यानुसार आंचल आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा दिली. 24 तास दोन कर्मचारी सक्षमच्या घरापुढे तैनात करण्यात आले आहेत. सक्षमच्या जातीमुळे मुलीच्या कुटुंबियांचा प्रेम प्रकरणाला आणि त्यांच्या लग्नाला विरोध होता. जातीय विद्वेषातून सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. केवळ जातीमुळे आम्हाला लग्नाची परवानगी दिली गेली नाही आणि जातीमुळेच त्याचा खून झाला, असे आंचल म्हणाली.
