TRENDING:

संभाजीनगर जिल्हा परिषद 2026 निकाल Live, पैठणमध्ये भुमरेंच्या गडाला लागणार सुरुंग? शिवसेनेच्या दोन्ही गटात कांटे की टक्कर

Last Updated:

Sambhajinagar ZP Election Result: पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sambhajinagar ZP Election Result: पैठण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून  9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काही कलांमध्ये शिवसेना शिंदे गट आघाडीवर आला आहे.
News18
News18
advertisement

पैठणच्या ढोरकीन गटात शिवसेनेच्या राधिका दिलीप जगताप आघाडीवर आहेत. याशिवाय चितेगाव गटात शिवसेनेचे कृष्णा गिधाने यांनी आघाडी घेतली आहे. तर बिडकिन गटातून ठाकरे गटाचे मनोज पेरे आघाडीवर आहेत. इथं शिवसेनेच्या दोन्ही गटात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे.

इथं माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पत्नी सुनिता वाघचौरे मात्र पिछाडीवर पडल्या आहेत. पैठण तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद गट आहेत. यात पिंपळवाडी, बिडकीन, पाचोड, नांदर, विहामांडवा, नवगाव, ढोरकीन आणि दावरवाडी अशा गटाचा समावेश आहे.

advertisement

आघाडी–पिछाडीचे चित्र

पैठण तालुक्यात शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात असल्याने अनेक गटांत तिरंगी व चौरंगी लढती आहेत. पिंपळवाडी (अनुसूचित जातीसाठी राखीव) गटात दलित-मुस्लिम, मराठा आणि ओबीसी मतांचे विभाजन निकालावर प्रभाव टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पैठणमध्ये पक्षनिहाय चित्र काय?

advertisement

शिवसेना (शिंदे): 2

शिवसेना (ठाकरे): 1

भाजप: 00

काँग्रेस:00

राष्ट्रवादी / अपक्ष: 00

खरं तर, पैठण तालुका छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. इथून अनेकदा भुमरे आमदारकीला निवडून आले आहेत. सध्या त्यांचे पुत्र विलास भुमरे येथील आमदार आहेत. त्यामुळे भुमरेच्या बालेकिल्ल्यात काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथं शिंदे गटाला मात देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या अंतर्गत कुरघोडीवर कोण सरस ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल.

advertisement

पिंपळवाडी गटात काँग्रेसचे सदानंद खडसण, भाजप पुरस्कृत रामनाथ केदारे, शिवसेना शिंदे गटाचे दादासाहेब गलांडे आणि भरत मुकुटमल यांच्यात चुरशीची लढत आहे.

पैठणमधील हाय होल्टेज लढती

नांदर गण: ठाकरे गटाचे डॉ. सुनील शिंदे × शिंदे गटाचे उदयसेन काळे

पाचोड गट: शिवराज भुमरे (ZP) यांच्याकडे लक्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

बिडकीन गट: मनोज पेरे × भाजपचे विजय चव्हाण

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर जिल्हा परिषद 2026 निकाल Live, पैठणमध्ये भुमरेंच्या गडाला लागणार सुरुंग? शिवसेनेच्या दोन्ही गटात कांटे की टक्कर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल