TRENDING:

झेडपीच्या निकालानंतर तिढा, सांगलीत कुणाला मिळणार सत्ता? लातूरमध्ये काँग्रेसला हुलकावणी

Last Updated:

जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होण्याची शक्यता असून कुठे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली याविषयी जाणून घेऊया

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात जिल्हा परिषदांच्या निकालानंतर राजकीय चित्र स्पष्ट झालंय. बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. मात्र काही जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण होऊ शकतो. कुठे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड जल्लोष केला. आता जल्लोषानंतर सर्वांना कोणत्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार, याचे वेध लागलेत.
ZP Election
ZP Election
advertisement

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं 51 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय. सोलापूरमध्ये भाजपनं 38 जागांसह एकहाती सत्ता मिळवलीय. सिंधुदुर्गमध्ये भाजपनं 27 जागांसह वर्चस्व मिळवलं. रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेनं 41 जागांसह सत्तेचा मार्ग खुला केलाय.

कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार?

रायगडमध्ये भाजप-शिवसेना एकूण 38 जागांसह सत्ता मिळवू शकतात. साताऱ्यात महायुतीतील तिन्ही पक्षांच्या एकत्रित जागांचा आकडा तब्बल 62 वर पोहोचतोय. त्यामुळे साताऱ्यात महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापुरातही महायुतीतील तिन्ही पक्षांकडे 41 जागा असल्यानं त्यांची सत्ता येणार असल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित 43 जागा असल्यानं महायुतीचा झेंडा फडकणार आहे. परभणीत महायुतीचा एकत्रित आकडा 44 असल्यानं त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झालाय. धाराशिवमध्येही महायुतीचा आकडा 40 असल्यानं तिथंही महायुती सत्तेत असणार आहे.

advertisement

सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी

बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्तेचं समीकरण जुळवण्यात यशस्वी होणार असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मात्र सांगलीत तिढा निर्माण झालाय. सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागा आहेत. तिथे बहुमताचा आकडा 31 आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा एकत्रित 30 हा आकडा बहुमतापर्यंत पोहोचत नाही. तर भाजपच्या 16, शिंदेंच्या शिवसेनेच्या 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 जागा म्हणजेच महायुतीचा एकत्रित आकडाही 29 पर्यंत पोहोचतोय. परिणामी इथे इतर 2 विजयी उमेदवार महत्त्वाचे ठरणार आहेत. सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.

advertisement

लातूर जिल्हा परिषदेत सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे. 59 जागा असल्यामुळे लातूरमध्ये बहुमताचा आकडा 30 इतका आहे. काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एक जागा जिंकली आहे. त्यामुळे मविआचा आकडा 25 पर्यंत पोहोचतोय. तर भाजपनं 18, शिंदेंच्या शिवसेनेनं 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 12 जागा जिंकून एकत्रितपणे 31 जागांचा आकडा गाठलाय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

त्यामुळे लातूरमध्येही महायुती सत्तेच्या जवळ जाताना दिसतेय. एकंदरीतच अकरा जिल्हा परिषदा महायुतीच्या ताब्यात जाणार आहेत. तर सांगलीतील तिढा कसा संपुष्टात येतो, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
झेडपीच्या निकालानंतर तिढा, सांगलीत कुणाला मिळणार सत्ता? लातूरमध्ये काँग्रेसला हुलकावणी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल