कुंडल गटामध्ये एक अत्यंत रंजक कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. येथे आमदार अरुण लाड यांच्या सून धनश्री लाड (भाजप) आणि आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड (काँग्रेस) यांच्यात विरुद्ध सामना होत आहे. नातेसंबंध बाजूला सारून दोन्ही बाजूंनी विजयासाठी मोठी ताकद लावली असून, कुंडलची जनता कोणाला कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या सर्व 4 गटांचे निकाल जाहीर होणार असून, विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील मतदारांनी नोंदवलेला विक्रमी टक्का हा प्रस्थापित सत्तेच्या बाजूने जातो की परिवर्तनाची लाट आणतो, हे काही तासांतच स्पष्ट होईल. पलूसच्या या निकालाचा परिणाम केवळ तालुक्यावरच नाही, तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणावर होणार आहे.
advertisement
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
पसूल जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : पसूलमधील विजयी उमेदवारांची यादी, कुणी उधळला गुलाल?
